आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या इमारतीचा भूमीपुजन सोहळा...महाराष्ट्रातील आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी...राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अधिकचा निधी मिळावा...आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या इमारतीचा भूमीपुजन सोहळा...महाराष्ट्रातील आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी...राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अधिकचा निधी मिळावा...आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई - महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला बळकटी मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी करतानाच मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करावी. जेणेकरून विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होता येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.


देवनार येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या शैक्षणीक आणि प्रशासकीय इमारतीचा भूमीपुजन सोहळा आज झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. केंद्रीय सचिव प्रिती सुदान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.


आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, या एकमेव अशा आंतरराष्ट्रीय संस्थेचे संशोधनाचे कार्य अभिनंदनीय आहे. या संस्थेतील विद्यार्थी आरोग्य विभागात इंटर्नशीप करीता आले तर त्यांचे स्वागतच करू. आरोग्य विषयक ज्या राष्ट्रीय योजना आहेतत्यांचा नेहमी सर्वे केला जात असतो त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग झाल्यास नक्कीच त्याचा फायदा योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी होऊ शकतो.


या संस्थेच्या माध्मयातून राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. संस्थेने केलेल्या संशोधनाचा फायदा त्यांना मिळू शकेल.त्याचबरोबर आरोग्य विषयक योजनांच सामाजिकदृष्ट्या लेखापरिक्षणही करावे, अशी मागणी श्री. टोपे यांनी यावेळी केली.


कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत....ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावशाली-केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. सर्वांसाठी आरोग्य या जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी आपला देश प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवेच्या आपल्या देशाचं हे मॉडेल अन्य देशांकडूनही राबविले जाईल, असेह त्यांनी यावेळी सांगितले. बाळंतपणा दरम्यान एकाही महिलेचा मृत्यू होऊ नये आणि देशातील अकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याध्येयाने काम केले जात आहे. या आंतरराष्ट्रीय संस्तेतील तरूण विद्यार्थ्यांनी संशोधनातून नविन योजना आरोग्य क्षेत्रात पुढे आणाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.