विविध कौशल्य आत्मसात करुन रोजगार मिळविणे गरजेचे - दिलीप गुरव नागठाणे काँलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न



विविध कौशल्य आत्मसात करुन रोजगार मिळविणे गरजेचे - दिलीप गुरव




नागठाणे काँलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

 

नागठाणे - नागठाणेच्या आर्टस् अँड काँमर्स काँलेजचा शिवाजी विद्यापीठाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कराड येथील दि.कराड अर्बन को-आपरेटिव्ह बॅंकेचे सी.ई.ओ. सी.ए.मा.श्री.दिलीप गुरव  म्हणाले की,विद्यार्थ्यांनी पदवी मिळविण्याबरोबरच करण्याबरोबरच नोकरी,उद्योग व व्यवसाय करण्याकरीता त्या त्या क्षेत्रामधील अनुभव प्राप्त केला पाहिजे.त्याचबरोबर विविध कौशल्य आत्मसात करुन रोजगार मिळविणे गरजेचे आहे.

 

ते पुढे म्हणाले की,चांगले नागरीक बनण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सकारात्मक दृष्टी असली पाहिजे.याप्रसंगीविद्यापीठ प्रतिनिधी म्हणून कराड येथील महिला महाविद्यालयाच्या गृह विज्ञान विभागाच्या सहयोगी प्राध्यपिका व शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरच्या अधिसभा सदस्या मा.डाॅ.ईला जोगी म्हणाल्या की,आपल्याकडे गुणवत्ता असेल तर संधी आपोआप निर्माण होतील.तसेच स्वत:मधील क्षमता वेळीच ओळखल्या तर यश निश्चित मिळते.

 

त्याचबरोबरप्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. अशोक करांडे म्हणाले की,पदवीला अर्थ प्राप्त करुन देण्याची जबाबदारी आपली स्वत:ची असून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला-गुणांना वावा देऊन उद्दिष्टये साध्य केले पाहिजे.

 

 सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता ( सामाजिक शास्त्रे विद्याशाखा) डॉ. जे.एस्.पाटील म्हणाले की,शिक्षण हे सर्वस्पर्शी व सर्वंश्रेष्ठ असून अज्ञानावर मात करण्याचे साधन आहे.तसेच या शिक्षणाचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर होणे गरजेचे आहे. 

     

याप्रसंगी सदर कार्यक्रमात स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभागप्रमुख प्रा.दिपक गुरव यांनी आभार प्रा.रघुनाथ गवळी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.आर.एम.कांबळे व प्रा.एस.के.आतार यांनी केले.कार्यक्रमास पदवी प्रमाणपत्र प्राप्त स्नातक, कृषीभूषण मनोहर साळुंखे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.गणेश साळुंखे, नागठाणे गावचे ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.