सातारा जिल्ह्यातील आठ अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह....14 महिन्याच्या बालकासह दोन जण अनुमानित रुग्ण


सातारा जिल्ह्यातील आठ अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह....14 महिन्याच्या बालकासह दोन जण अनुमानित रुग्ण


कराड - कोविड- 19 आजाराने बाधित असलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 14 वर्षाच्या बालकासह दोन जणांना अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


तसेच फिनलॅड येथून प्रवास करून आलेल्या 32 वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोद गडकरी यांनी दिले आहे.


सातारा जिल्ह्यातील चौदा महिन्याच्या बालकाला ताप, खोकला व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने बालरोगतज्ञ ह्यांच्या सल्ल्यानुसार अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बालकाच्या घशातील स्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे.


सातारा जिल्ह्यातील सात निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेचा असे एकूण आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर एक अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कोविंड 19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सात निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्रावाचाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.