वासुदेव करतोय कोरोनाची जनजागृती

वासुदेव करतोय कोरोनाची जनजागृती


कराड - मसूरचे विद्यमान सरपंच पंकज दीक्षित यांच्या अभिनव कल्पनेतून उपसरपंच विजयसिंह जगदाळे व सर्व सदस्यांच्या सहकार्याने कोरोनाच्या जनजागृतीसाठी थेट वासुदेवाची स्वारी मसूरमध्ये साकारली. 


चंद्रकांत कदम या युवकाच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या उपक्रमासाठी व जनजागृतीसाठी सरपंच दीक्षित यांनी सनी कवळे (पाली) येथील कलाकारास पाचारण केले व अभिनव उपक्रमाची कल्पना दिली. या कलाकाराने यावी उपक्रमास तात्काळ संमती दिली व वासुदेवाच्या वेषात जनजागृती करण्यास सुरवात केली. मसूरमध्ये कोरोनाच्या जनजागृतीसाठी वासुदेवाची स्वारी दारोदारी फिरत आहे. कोरोनाची धास्ती घेतलेल्या जनतेमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडवत लोकांच्यातील भीती दूर करण्यात वासुदेव यशस्वी झाले आहेत. 


गीतकार शंकर उमापे यांनी गीत रचून साथ दिल्याने या अभिनव उपक्रमाचे ठिकठिकाणी स्वागत व कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने दारोदारी गुनगुणलेले गीत असे...
कोरोना घालवायला मसूरमध्ये आली वासूदेवाची स्वारी ।।धृ!!
चिनमधी त्याचा जन्म झाला
साऱ्या जगाचा तो वैरी झाला.
बघता बघता तो भारतात आला.
आजुन उपाय सापडना त्याला.
सगळ्या औषधाला पडलाय भारी.
कोरोनाला घालवायला मसूर मध्ये आली वासुदेवाची स्वारी !!१!!
पण भिऊ नका दादा माऊली त्याला.
शिंकताना खोकताना रुमाल धरा तोंडाला.
सर्दी, ताप,खोकला, दावा सरकारी डॉक्टरला.
निरोगी राहतील घरातली मंडळी सारी.
कोरोना घालवायला मसूर मध्ये आली वासूदेवाची स्वारी !!२!!
टि व्ही च्याच बातम्या बघत रहायच.
मोबाइलच्या खोट्या मेसेजला न्हाय घाबरायच.
गर्दीच्या ठिकाणी कुणी न्हाय फीरायच.
मित्रांना लांबनच नमस्कार करुन भेटायच.
भाजी,अंडी,मटण.चांगली शिजवायची सारी.
कोरोना घालवायला मसूर मध्ये आली वासूदेवाची स्वारी !!३!! 


या अभिनव उपक्रमाचे मसूर वस्त्यांमध्ये स्वागत होत आहे.


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image