कराडात शिक्षण महोत्सव 2020 चे आयोजन 45 शैक्षणिक स्टॉल, विद्यार्थी-शिक्षक पालकांसाठी पर्वणी


कराडात शिक्षण महोत्सव 2020 चे आयोजन

45 शैक्षणिक स्टॉल, विद्यार्थी-शिक्षक पालकांसाठी पर्वणी

 

कराड,  ः कराड पंचायत समितीच्यावतीने शिक्षण महोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. 8  ते 11 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात विविध विषयांवरील 45 शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले असल्याची माहिती कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांची उपस्थिती होती.

 

 प्रणव ताटे म्हणाले, 8 मार्च रोजी महोत्सवाचा पहिला दिवस असून सकाळी 8 वा. चित्ररथ व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, वित्त आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई,  जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची उपस्थिती आहे.

 

दुपारच्या सत्रात महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांची प्रकट मुलाखत नेहा दोशी घेणार आहेत.

 

 9 मार्च रोजी सकाळी 10 वा. शिक्षक-विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन माध्यमिकचे संचालक दिनकर पाटील यांच्याहस्ते तर ज्येष्ठ साहित्यीक डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, डॉ. बसवेश्‍वर चेणगे, दत्तात्रय पवार यांची उपस्थिती असणार आहे. दुपारच्या सत्रात प्राथमिक शाळेतील मुलांचा कलागुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेते अवधूत जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव अध्यक्षस्थानी असणार आहेत. शिक्षण अधिकारी राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती आहे.

 

10 रोजी सकाळी 10 वा. बालक-पालक यांच्या संबधांना छेदणारी समाजमाध्यमे या विषयावर शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन शिक्षण, क्रीडा व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्याहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत  आहेत. चर्चासत्रात प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण, किशोर काळोखे, भाषणकला प्रशिक्षक शशांक मोहिते, संपादक सुजित आंबेकर यांचा सहभाग आहे. नाटककार जगदीश पवार सूत्रसंचालन करणार आहेत. दुपारच्या सत्रात उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कलागुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील आहेत. अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आहेत.

 

11 रोजी सकाळी 10 वा. शिक्षक गीतगायन सादरीकरण कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12 वा. आनंदाच्या वाटेवर या विषयावर प्रेरणादायी वक्ते संजय कळमकर यांचे व्याख्यान दुपारी 2 वा. समारोप होणार असून यामध्ये स्वच्छ, सुंदर शाळा ग्राम स्पर्धा व आदर्श वर्ग पारितोषिक वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. मोहनराव कदम तर आ. आनंदराव पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, उपशिक्षणाधिकारी हणमंतराव जाधव, सुधीर महामुनी, धनंजय चोपडे, रमेश चव्हाण यांची  उपस्थिती आहे.