आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आयोजित सर्व कार्यक्रम कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आले आहेत


आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आयोजित सर्व कार्यक्रम कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आले आहेत


कराड : मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस आहे, सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव जाणवत आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात देखील जाणवत आहे, राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व खाजगी, शासकीय तसेच गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्या बाबतच्या सूचना दिल्या आहेत, या अनुषंगाने मा. श्री. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.अशी माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.


तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) (17 मार्च 2020) वाढदिवसा दिवशी बाहेर गावी असल्याने कराड येथे उपस्थित राहणार नाहीत. तरी सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहनही मनोहर शिंदे यांनी केले आहे.