डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 


डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 


कापूसखेड, - कृष्णा कारखान्याच्या विरोधकांनी हिंमत असेल तर त्यांच्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी जे गुण उधळले त्याबद्दल बोलावे? त्यांनी शेतकरी सभासदांसाठी काय केले?, त्यांनी इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले? त्यांना तुरूंगात का जावे लागले? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत, असे आव्हान कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना दिले. कापूसखेड (ता. वाळवा) येेथे आयोजित कारखाना सभासद संपर्क मेळाव्यात ते बोलत होते.


व्यासपीठावर कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, गिरीश पाटील, दिलीप पाटील, अमोल गुरव, सुजीत मोरे, वाळवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत पाटील, बहे गावचे उपसरपंच मनोज पाटील, कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, नेर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य शरद बल्लाळ, महेश पाटील, सयाजी पाटील, राजेश पाटील, शशिकांत पाटील, टी. वाय. पाटील, रवींद्र पाटील, कृष्णा बँकेचे संचालक दिनकर गडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतानाच, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखाही मांडला. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत आम्ही सभासदांना मोफत साखर देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी अनेकांनी आमच्या या घोषणची खिल्ली उडविली. पण आम्ही ही घोषणा प्रत्यक्षात साकारून विरोधकांची तोंडे बंद केली. डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कारखान्याचे भत्ते नाकारून सहकारात एक नवा आदर्श निर्माण केला. याच काळात कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक गाळप झालेले आहे. विरोधकांनी त्यांच्या काळात जे पोते 22 रूपयांना खरेदी केले, तेच पोते आम्ही अवघ्या 13 रूपयांना घेऊन कारखान्याचे कोट्यवधी रूपये वाचविले. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी सुरू केलेली उच्चांकी दराची परपंरादेखील डॉ. सुरेशबाबांच्या काळात जपली गेली. एवढा चांगला कारभार सुरू असतानाही विरोधक मात्र कारखान्याच्या कारभारावर बोलण्यापेक्षा अन्य मुद्यांवरच बोलून सभासदांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या 5 वर्षाच्या काळात काय गुण उधळले याची माहिती जरा सभासदांना द्यावी, म्हणजे तुमचे खरे रूप उघड होईल.


निवडणुका जवळ आल्यामुळे ज्यांनी कारखान्याच्या प्रॉपर्टीवर, शेतकरी, वाहतूकदारांवर कर्ज काढले आणि त्यासाठी ज्यांना तुरूंगात जावे लागले, त्यांच्या अंगात आता इलेक्शनचे वारे शिरलेय, अशी टीका माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्यावर करत कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, की कृष्णावर आता भोसले पॅनेलची सत्ता नसती तर हा कारखाना केव्हाच भंगारात गेला असता. आज सुरेशबाबांच्या नेतृत्वामुळे कारखाना चांगली प्रगती करत आहे. पण विकासावर बोलायला विरोधकांकडे मुद्देच नसल्याने ते सोशल मिडियातून नको ती टिका करत आहेत. हॉस्पिटलवर आणि ट्रस्टवर टीका करणार्‍या विरोधकांनी जरा त्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होऊन उपचार घ्यावेत आणि तिथं मिळणार्‍या सेवासुविधांची माहिती घ्यावी.


सुरेशबाबांच्या नेतृत्वात काम करायला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानस्पद गोष्ट असून, या काळात कारखान्याची कोट्यवधी रूपयांची बचत करण्यात आणि कारखाना सुस्थितीत आणण्यात आम्हाला यश आले, असे प्रतिपादन संचालक लिंबाजीराव पाटील यांनी केले.


यावेळी राजेंद्र पाटील, संपत पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार पॅनेलच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला तंटामुक्तीचे समितीचे माजी अध्यक्ष हौसेराव पाटील, सुरेश देसाई, जयकर पाटील, सुरेश पाटील, परशुराम पाटील, भाऊसाहेब मोकाशी, डॉ. एस. व्ही. पाटील, हनुमंत कुंभार, पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, भानुदास देसाई, सिकंदर मुल्ला, विजय मोकाशी, बाजीराव पाटील, संदीप पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सोशल मिडियातील अफवांना भूलू नका 


सध्या सोशल मिडियातून ना. जयंत पाटील यांच्या अनुषंगाने पसरविल्या जात असलेल्या अफवांना कोणीही बळू पडे नये. कृष्णा कारखान्याच्या बाबतीत ना. जयंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही सर्व जयंत पाटील यांना मानणारे असून, कृष्णा कारखान्याच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व डॉ. सुरेश भोसले यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले.


हनुमान मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सहकार्य


कापूसखेड येथील हनुमान मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कृष्णा सहकारी बॅकेतर्फे योग्य ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली.