मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तुंची जादा दराने विक्री करणाराची माहिती द्यावी
पुणे : सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे. अशा जादा दराच्या विक्री बाबत तक्रार असल्यास उपनियंत्रक वैधमापनशास्त्र पुणे विभाग पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पाच जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये संपर्क साधावा,असे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे.
संपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे- उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग, पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे जिल्हा- दुरध्वनी क्र. 020-26137114, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सातारा जिल्हा- दुरध्वनी क्र. 02162-232143, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सांगली जिल्हा- दुरध्वनी क्र. 0233-2600053,सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, कोल्हापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0231-2542549, सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र, सोलापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0217-2601949 अशी आहेत.