कोयना धरणातील 74.87 टीएमसी पाणी १० वर्षात बाष्पीभवनाद्वारे ढगात.....चालूवर्षी आत्तापर्यंत 6.47 टीएमसीचे झाले बाष्पीभवन


कोयना धरणातील 74.87 टीएमसी पाणी १० वर्षात बाष्पीभवनाद्वारे ढगात.....चालूवर्षी आत्तापर्यंत 6.47 टीएमसीचे झाले बाष्पीभवन


कराड - कोयला धरणातील पाणीसाठा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दरम्यान बाष्पीभवनाद्वारे धरणातील पाणी काहीअंशी कमी होते ही बाब मात्र, गांभीर्याने घेतली जात नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये कोयना धरणातील तब्बल 74.87 टीएमसी पाणी हे बाष्पीभवनाद्वारे ढगात गेले आहे. 


जागतिक तापमानवाढ, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण वाढत आहे.याचा नकळत विपरीत परिणाम कोयना धरणाच्या पाण्यावर होतो आहे. कोयना धरण हे चोहोबाजूंनी जंगलाने वेढले गेले असले तरी ग्लोबल वॉर्मिंगचा फटका धरणातील पाणीसाठ्याला बसला आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. सन 2010 ते 2019 या दहा वर्षांत कोयना धरणातील तब्बल 74.87 टीएमसी पाणी हे बाष्पीभवनाद्वारे ढगात गेले आहे. दरम्यान चालूवर्षी आत्तापर्यंत 6.47 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यामुळे भविष्यात बाष्पीभवनाद्वारे जाणारे पाणी वाचविण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.


94 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणाची उंची वाढविण्याचे काम मध्यंतरीच्या काळात झाल्यानंतर सध्या 105 टीएमसी पाणीसाठा कोयना धरण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा फटका कोयना धरणाला ही बसतो आहे. धरणाच्या आजुबाजूला कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यासह जंगले आहेत. भरपूर वेगवेगळी झाडेझुडपे आहेत. या कारणांमुळे जमिनीची धूप अतिशय कमी प्रमाणात होते.दरम्यान केवळ या बाबीकडे लक्ष केंद्रित करून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. बाष्पीभवनाद्वारे पाण्याचे होणारे नुकसान याबाबत विचार केला गेला पाहिजे असे अभ्यासकांचे मत आहे.


कोयना धरण ते तापोळा हा तब्बल 67.5 कि. मी. असलेला शिवसागर जलाशय परिसर आहे. 180 चौ. कि. मी. अंतरावर हे पाणी पसरले असल्याने व तापमान, वारा, सूर्यप्रकाश व हवेतील अद्रता याचा सर्वाधिक परिणाम या पसरलेल्या पाण्यावर होत असल्याकारणामुळे इतर धरणांच्या तुलनेत कोयना धरणातील पाण्यावर मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होते.


पाणीसाठा कमी झाला नाही पाहिजे


कोयना धरणातील पाणी साठ्यावर वीज निर्मिती होत असते. त्याचबरोबर सिंचनाला पाणी ही याच ठिकाणाहून जाते. यामुळे धरणातील पाणीसाठामध्ये कोणत्याही कारणाने कमी होऊ नये. यासाठी वरिष्ठ पातळीवर उपाययोजना होणे आवश्यक आहे