हुपरीत 8 रोजी पत्रकार स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन 

 


हुपरीत 8 रोजी पत्रकार स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन 

 

हुपरी - हुपरी परिसर पत्रकार संघाच्यावतीने रविवार दि 8 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार स्नेह मेळावा आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

हुपरी परिसर पत्रकार संघटनेने या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले असुन ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर परिसरातील सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे. माजी खासदार कल्लाप्प्पाणा आवाडे, आमदार प्रकाशराव आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुरेशराव हाळवनकर, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोहिते, जीवन प्राधिकरणचे संचालक महावीर गाट, इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार आदी विविध गावातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि हुपरीच्या प्रथम नगराध्यक्ष सौ जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली हां कार्यक्रम होणार आहे.

 

यावेळी खलील व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करन्यात येनार आहे - जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरी , श्री हनुमान सहकारी दुग्ध आणि कृषीपूरक सेवा संस्था यळगुड, पैसाफंड सहकारी बँक हुपरी, श्री बिरदेव एजुकेशन सोसायटी पट्टण कोडोली, श्री मधुअसुंदाई डेअरी फार्म हुपरी, डॉ. सयाजी व डॉ.प्राची घुणके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नानासाहेब गाट, इचलकरंजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, जि.प सदस्या सौ स्मिता शेंडुरे, माजी सरपंच मंगलराव माळगे, ज्येष्ट नेते यशवंतराव पाटील - हुपरी, कृष्णाजी मसूरकर - पट्ट्ण कोडोली, दिलीप पाटील प्रबोधन, युवराज करडे, प्रमोद बाळासाहेब पाटील, अँड एम टी देसाई, श्रीमती सविता रमेश पाटील -  पट्ट्ण कोडॊली आदींचा सन्मान करन्यात येणार आहे. हुपरी परिसरातील पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते यांचा स्नेह मेळावा ही यावेळी आयोजित करन्यात आला आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघाने केले आहे.