कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे काळाची गरज सौ. वेदांतिकाराजे....महिलांनी घरीच कापडी मास्क तयार करुन वापरण्याचे आवाहन


कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे काळाची गरज सौ. वेदांतिकाराजे....महिलांनी घरीच कापडी मास्क तयार करुन वापरण्याचे आवाहन


सातारा- कोरोना या साथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. आपला देश आणि महाराष्ट्रासह आपल्या सातार्‍यातही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना साथीचा ङ्गैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रत्येकाने साथ द्यावी आणि कोरोना टाळण्यासाठी महिलांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवून स्वत:ला व कुटूंबीयांना कोरोनापासून दूर ठेवावे, असे आवाहन करतानाच कोरोना आजार टाळण्यासाठी मास्क वापरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग‘ुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.


आपल्या देशात आणि खास करुन सातार्‍यात कोरोना रुग्णांची सं‘या वाढू लागली आहे. प्रशासने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणीही विनाकारण घराबाहेर ङ्गिरु नये, प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच खास करुन महिलांनी कोरोनापासून स्वत:चे आणि कुटूंबीयांचे रक्षण करण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. आजच्या घडीला बहुतांश सर्वच घरांमध्ये शिलाई मशिन उपलब्ध असते. त्यामुळे महिलांनी घरातील कापड स्वच्छ धुवून, निर्जंतुक करुन त्यापासून तीन घड्यांचा मास्क बनवावा. त्यासाठी इलॅस्टीक अथवा नाडीचा वापर करावा. मास्क बनवणे अवघड नाही. त्यामुळे महिलांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवावेत आणि स्वत: आणि कुटूंबातील सर्वांना ते वापरण्याची सक्ती करावी, असे सौ. वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे.


प्रत्येक व्यक्तीसाठी दोन मास्क बनवावेत. एकदा वापरलेला मास्क पुन्हा स्वच्छ धुवून, निर्जंतुक करुन त्याचा पुन्हा वापर केला जावू शकतो. अशा कापडी मास्कसाठी खर्चही होणार नाही. त्यामुळे काळाची गरज ओळखून सर्व महिलांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवून त्याचा वापर करावा आणि स्वत:ला व कुटूंबीयांना कोरोनापासून दूर ठेवावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले आहे.