मतदार याद्यांचा सुधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

मतदार याद्यांचा सुधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर


पुणे - भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा सुधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे. त्याअनुषंगाने दिनांक 13 मार्च, 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून संलग्न पत्रात नमुद केल्याप्रमाणे या यादीबाबत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.


 भारत निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रमाचा कालावधी पुढीलप्रमाणे- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 13 मार्च,2020 (शुक्रवार) ते 15 एप्रिल,2020(बुधवार), विशेष मोहिमांचा कालावधी दि. 28 मार्च 2020 (शनिवार) आणि दि. 29 मार्च 2020 (रविवार) तसेच दि. 11 एप्रिल, 2020 (शनिवार) आणि दि. 12 एप्रिल 2020, दावे व हरकती निकालात काढणे याचा कालावधी दि. 30 एप्रिल, 2020(गुरूवार) पुर्वी प्रारूप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धि करीता आयोगाची परवानगी घेण्याचा कालावधी दि. 6 मे 2020 (बुधवार), डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाईचा कालावधी दि. 11 मे 2020 (सोमवार) पुर्वी, मतदार यादीची अंतीम प्रसिद्धीकरणेचा कालावधी दि. 15 मे 2020 (शुक्रवार) पर्यंत आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.