समाज जोडता आला पाहिजे : अरुण गोडबोले महिला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ


समाज जोडता आला पाहिजे : अरुण गोडबोले
महिला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ


कराड  - आपल्या शिक्षणाचा फायदा कुटुंब, समाज, देशाला करुन देता आला पाहिजे. शिक्षणाने समाज जोडता आला पाहिजे, असे प्रतिपादन  प्रसिद्ध करसल्लागार व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांनी केले.


शिक्षण मंडळच्या महिला महाविद्यालय येथे दुसऱ्या पदवी
प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलत होते. शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, अधिसभा सदस्य डॉ. इला जोगी, प्राचार्य डॉ. स्नेहल प्रभुणे यांची उपस्थिती होती.


अरुण गोडबोले म्हणाले, आयुष्यात पदवी‌ मिळविणे हा महत्वाचा टप्पा आहे. प्रत्यक्ष व्यासपीठावर पदवी घेण्याचा
आनंद निराळा असतो. पूर्वी शिक्षण दुर्मीळ होते. पदवी मिळाली म्हणजे बरेच काही मिळाले अशी पूर्वीची स्थिती होती. मा, आजची स्थिती निराळी आहे. आज पदवीसोबतच अन्य कौशल्येही प्राप्त केली पाहिजेत. त्यासाठी आपला क्षमता
आपणच शोधल्या पाहिजेत. चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, विद्यापीठाला या समारंभात नेमका न्याय देता येत नाही, म्हणून विद्यापीठाने हा कार्यक्रम महाविद्यालयाकडे सोपवला आहे. संपूर्ण विद्यापीठात इतके मोठे मुलींचे झांजपथक आपल्याच महाविद्यालयात आहे.


प्र. प्राचार्य डॉ. स्नेहल प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. पी. बी. दरुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संस्थेच्या व्हाईस चेअरमन शिल्पा वाळिंबे, सीईओ योगेश चिवटे, पदवीप्राप्त विद्यार्थिनी, पालक, प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. सौ. मधुरा मोहिते यांनी आभार मानले. प्रा. अशोक चव्हाण यांनी‌ सूत्रसंचालन केले.