कराड ४, सातारा ९ कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल : डॉ. आमोद गडीकर 


कराड ४, सातारा ९ कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल : डॉ. आमोद गडीकर 


कराड :  सातारा जिल्ह्यात दिनांक 15 मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले 7 प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत. तसेच सातारा जिल्हयातील 1 पुरुष व 1 महिला हे 2 रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन आज दाखल करून घेण्यात आले असुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


  सातारा जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील विलगीकरण कक्षात दि.28 मार्च रोजी 48 वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास  त्रास होत असल्याने,  दि.29 मार्च रोजी 80 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने  आणि आज दि.30 मार्च रोजी  एका वर्षाच्या  मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे. या सर्व 4 रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.  प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image