राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होणार - शालेय सहसचिव राजेंद्र पवार


राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होणार - शालेय सहसचिव राजेंद्र पवार


कराड  - राज्यातील सर्वच ६६ हजार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.यासाठी इशिमन.डेव्हलपमेंट बँक सत्तावीशे कोटीची मदत करणार आहे असे प्रतिपादन राज्याचे शालेयशिक्षण व क्रिडा विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी केले.


कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सवात भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण,क्रिडा व अर्थ समितीचे सभापती मानसिंग जगदाळे,मानसोपचार तज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण, किशोर काळोखे,शंशाक मोहिते, सुजित आंबेकर,जगदीश पवार, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, सुहास बोराटे, सदस्य रमेश चव्हाण, अँड शरद पोळ,काशिनाथ कांरडे,गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार,गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर,शालेय पोषण आहार अधिकक्षक विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत निकम, जमिला मुलाणी,महाबळेश्वर गटशिक्षणाधिकारी आंनद पळसे, अटपाडी गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी याची उपस्थिती होती.


राज्याचे शालेय उपसचिव राजेंद्र पवार म्हणाले शाळांमध्ये बदल घडवून आणन्याचे काम फक्त शिक्षकच करु शकतो. आज राज्यात शिक्षकांनी मनापासून काम केलेने ३00 शाळा सक्षम झाले असुन गुणवत्ता वाढली आहे. मुलांचे शिक्षण हे मात्र, भाषेतुनच झाले पाहिजे. संवाद हा महत्त्वाचा भाग आहे मग तो शिक्षक - पालक किंवा शिक्षक - विद्यार्थी व पालक यांचा असो.या संवादातून मुलांची जडणघडण होत असते. पालकांनी मुलांची आवड,निवड ,कल,पाहून त्यांना शिक्षण दिले पाहिजे.जेथे ज्ञान चांगले मिळते तिथेच पालक मुलांना शाळेत प्रवेश घेतात.


यावेळी शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात सातत्याने. बदल घडवत आहेत याला शिक्षकांनी सामोरे जाण्याची गरज आहे. विद्यार्थी गुणवत्ता धारी घडविण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन सहशालेय उपक्रम राबविले पाहिजेत.ग्रामीण भागातील विद्यार्थी चा विकास झाला पाहिजे.


प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले व आभार आनंद पळसे यांनी मानले.