कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
कराड - गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसने भारतात पाय रोवयाला सुरुवात केली असताना या वायरस बाबत जनजागृती करण्यासाठी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कराड उत्तरचे युवा नेते,सह्याद्रि सहकरी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांच्या मार्गदर्शना खाली निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्षपराग रामुगडे, कराड दक्षिण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटील, सर्जेराव पानवळ,गणेश चव्हाण, अक्षय कदम, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सदर माहितीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कराड व तहसीलदार कराड यांना देण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून भारतात व महाराष्ट्रात कोरोणा वायरसचे संशयित रुग्ण निदर्शनास आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा रोग संसर्गजन्य असून तो एकापासून दुसऱ्या लोकांपर्यंत झपाट्याने पसरत आहे त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी सदरच्या कोरोना वायरचे गांभीर्य लक्षात घेता आपल्या कराड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचना देऊन त्यांची जनजागृती करून लोकांना माहिती देणे व त्यापासून काळजी कशी घ्यावी याबाबत सूचना करणे व मार्गदर्शन करणे तसेच गावोगावी त्याची जाहिरात प्रसिद्ध करून ग्रामीण भागातील लोकांनाही सतर्क राहण्यास ग्रामपंचायतीच्या वतीने उपयोग होईल असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.