प्रकाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वास्क व हॅडवॉशचे वाटप


प्रकाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वास्क व हॅडवॉशचे वाटप

 

कराड - राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष, परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव  यांच्या वाढदिवसानिमित्त मंडई परिसरात मास्क व हॅडवॉशचे वाटप करण्यात आले.

 

कोरोना या संसर्ग आजाराने देशभरात थैमान घातले आहे. याचे पडसाद राज्यासह जिल्ह्यात उमटत आहेत. प्रशासनाच्या जागृकतेमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रामणावर चालू आहेत. गर्दीचे कार्यक्रम, मोठ्या प्रमाणावर समुहाने एकत्र येणे याला प्रतिबंध घालण्यात येत आहे.

 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत कराड येथील राजमाता प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मंडई परिसरातील किरकोळ व्यापारी व भाजीपाला विक्रेते यांना मास्क व हॅडवॉशचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सलीम मुजावर, आरोग्य सभापती महेश कांबळे, माजी नगरसेवक सुभाष घोडके, बंटीशेठ कदम, शेणोलीचे माजी उपसरपंच प्रकाश कणसे, सर्जेराव पाटील, सुनिल चव्हाण, सुनिल पाटील, शरीफ मुल्ला, अमोल घोडके, यशराज घोडके यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.