कृष्णा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायबेटीक फूट तपासणी मशिन दाखल...मधुमेह रुग्णांसाठी ठरणार वरदान; कराडमधील पहिलेच मशिन


कृष्णा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायबेटीक फूट तपासणी मशिन दाखल...मधुमेह रुग्णांसाठी ठरणार वरदान; कराडमधील पहिलेच मशिन


कराड - मधुमेहाची व्याधी जडलेल्या अनेक रूग्णांना जखम झाल्यास ती लवकर बरी होत नाही. याकडे दूर्लक्ष केल्यास ती जखम बळावते आणि वेळप्रसंगी नाईलाजाने संबंधित अवयव काढावा लागतो. अशा रूग्णांनी वेळीच तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास या त्रासापासून मुक्ती मिळविणे शय असते. त्यासाठीचे अत्याधुनिक असे डायबेटीक फूट तपासणी मशिन कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. कराडमधील हे पहिलेच मशिन असून, या मशिनद्वारे केलल्या जाणार्‍या तपासणीनंतर डॉटरांच्या योग्य सल्ल्याने उपचार घेतल्यास संभाव्य धोका टाळता येणार असल्याने हे मशिन मधूमेह रूग्णांसाठी वरदान ठरणार आहे.


कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन विभागाअंतर्गत मधूमेह व हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी नुकताच प्रतिबंधात्मक औषधोपचार विभाग सुरू करण्यात आला आहे. अलीकडे धकाधकीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगात दर 30 सेकंदाला कोणत्या ना कोणत्या कारणाने रूग्णांच्या पायाचे बोट, पाऊल असे अवयव काढावे लागतात. दूदैवाने यातील 90 टक्के घटना या मधुमेही रूग्णांच्या बाबतीत घडून येतात. मधुमेह झालेल्या व्यक्तीने त्याला होणार्‍या जखमेकडे दूर्लक्ष केल्यास ही चूक महागात पडू शकते. त्यामुळेच भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी आत्तापासूनच योग्य काळजी घेऊन पुरेसे उपचार घेतल्यास त्यापासून सुटका मिळविणे शय आहे.


या विभागात दाखल झालेल्या नव्या अत्याधुनिक डायबेटीक फूट तपासणी मशिनद्वारे मधूमेह जडलेल्या व्यक्तीच्या पायांची तपासणी, संवेदना, तापमान, रक्तपुरवठा, पावलांचे प्रेशर इत्यादी बाबींची तपासणी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपचार घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. गौरी ताम्हणकर यांनी दिली. कराडमध्ये अशाप्रकारचे अद्ययावत मशिन पहिल्यांदाच दाखल झाले असून, मधूमेह रूग्णांसाठी ते लाभदायक ठरणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी ही तपासणी माफक दरात होणार असून, रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे.