जनता कर्फ्यू चे काटेकोर पालन करा- आ. शिवेंद्रसिंहराजे

जनता कर्फ्यू चे काटेकोर पालन करा- आ. शिवेंद्रसिंहराजे


सातारा- जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. आपल्या देशातही या साथीचा प्रसार होत असून महाराष्ट्रात रुग्णांची सं‘या जास्त आहे. ही साथ आटोक्यात येण्यासाठी आणि नागरिकांना या विषाणूची लागण होवू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी सातारा शहरातील नागरिकांसह जिल्हावासियांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.


कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या सुचनेनुसार रविवारी सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुका तसेच संपुर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक, दुकानदार, कारखानदार, मालक, चालक या सर्वांनीच जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होवून सकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत सर्वप्रकारचे दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आपआपल्या घरामध्ये बसून रहावे. कोणीही बाहेर ङ्गिरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा ङ्गैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे.


त्यामुळे सर्वांनीच जनता कर्फ्यू ला उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद देवून कोरोना विषाणूला हद्दपार करुया. आपली स्वत:ची आणि सर्वांचीच काळजी आपण घेवू आणि निरोगी आरोग्य जगू, यासाठी सर्वांनी सहकार्य करु, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.