ठोमसे सोसायटीमध्ये नारी शक्तीचा सन्मान: सत्यजितसिंह पाटणकर


ठोमसे सोसायटीमध्ये नारी शक्तीचा सन्मान: सत्यजितसिंह पाटणकर

 

पाटण (प्रतिनिधी) -  ठोमसे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी एका महिला भगिनीला संधी देऊन खऱ्या अर्थानं ठोमसे येथील ग्रामस्थांनी नारी शक्तीचा सन्मान केला आहे. पुरुष प्रधान संस्कृतीला बाजूला ठेवून एका नवीन विचाराची ही सुरवात सोसायटीच्या विजयापेक्षाही अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. ठोमसे सोसायटी येणाऱ्या काळात नक्कीच उत्तुंग भरारी घेईल आणि त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील असे अश्वासन पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी ठोमसे सोसायटीमधील नुतन संचालक मंडळाचे व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना दिले.

 

ठोमसे वि.का.स. सेवा सोसायटीची यावेळची सार्वत्रिक निवडणुकही पुर्णपणे एकतर्फी झाली. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटानेच निर्विवाद वर्चस्व गाजवत  एकूण १३ पैकी १२ जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. विरोधी ना. शंभुराज देसाई गटाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. सर्व विजयी उमेदवारांनी एक मताने चेअरमनपदाची सूत्रे सौ. नंदा नलवडे यांच्या हाती देऊन, एक नवीन आर्दशवत पांयडा पाडला. या यशानंतर नुतन संचालक मंडळ, सर्व विजयी उमेदवार, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी सत्यजितसिंह पाटणकर यांची भेट घेतली. यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.

 

यावेळीबोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, ठोमसे सोसायटीच्या या नुतन संचालक मंडळानेही गतवेळच्या संचालक मंडळासारखे जनहिताच्या योजना राबवव्यात. सोसायटीच्या चेअरमनपदी एका महिलेची निवड हा खरंच एक आर्दश निर्णय आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून प्रयत्न करणे आज गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना कर्जाच्या माध्यमातून सहकार्य करणे, लघुउद्योग उभारण्यासाठी कर्ज देणे, प्रशिक्षण आयोजित करणे यासारखे उपक्रम राबवले पाहिजेत. योगायोगाने सोसायटीच्या चेअरमनपदी एक महिलाच असल्याने त्या महिलांच्या समस्या चांगल्याप्रकारे समजु शकतात आणि त्या नक्की सोडवूही शकतील. त्याचबरोबरीने शेतकरी, तरुण उद्योजक, व्यावसायिक यांच्यासाठीही सोसायटीच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करावी.  त्याचबरोबर सोसायटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबविले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. या नुतन संचालक मंडळाने सर्वांना सोबत घेऊन प्रगतीपथावर वाटचाल करावी यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे अश्र्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते विजयी उमेदवार सौ.नंदा नलवडे, गणेश कदम, हणमंत माने, सखाराम देसाई, तानाजी साळुंखे, बाळासो माने,  अरविंद कदम, सुभाष लोहार, धनाजी मोरे, जगन्नाथ डोंगळे, धोंडीबा झोरे, शंकर भिसे यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी विकास शिलवंत, सुरेश नलवडे, जयसिंग डोंगळे, विलास माने, बजरंग मोरे,अमोल माने, दिलीप माने,महेश माने,राजेंद्र डोंगळे, जोतिराम लोहार, दयानंद शिलवंत, दत्तात्रय कदम, शिवाजी कदम, काशिनाथ कदम, दादु शिलवंत, बाळासो शिलवंत, विलास नलवडे, दादा नलवडे, संजय नलवडे, दिनकर मोरे, विठ्ठल सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image