सातारा जिल्ह्यातील तिघांचा अनुमानितचा रिपोर्ट निगेटिव्ह.......२ परुष,१महिलेचा समावेश


सातारा जिल्ह्यातील तिघांचा अनुमानितचा रिपोर्ट निगेटिव्ह.......२ परुष,१महिलेचा समावेश
        
सातारा : सातारा जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेल्या तीन व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासण्यात आले असून सदर तिन्ही व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.


अबुधाबी येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक व 39 वर्षीय पुरुष आणि कॅलिफोर्निया येथून आलेली 51 वर्षीय महिला असे एकूण तीघांना काल दि. 24 रोजी अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.


सातारा जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.कोरोनाबाबत सातारा जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. दरम्यान नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियाद्वारे वारंवार करीत आहेत.