कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची बैठक संपन्न


कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची बैठक संपन्न


कराड - महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचे सुमारे ४१ विषाणू बाधित लोक आढळून आले असून पाटण या ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कोरोनो आजाराची दक्षता घेणेकरीता तालुका प्रशासनाने सतर्क रहावे,मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये या विषाणूसंदर्भात माहिती देणेकरीता तसेच नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याकरीताची माहिती प्रक्रिया तालुका प्रशासनाने त्यांच्या अख्यारितीतील सर्व यंत्रणामार्फत राबवावी अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना देवून कोरोनो विषाणू बाधित लक्षणे आढळली तर पाटण या तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कशाप्रकारे उपाययोजना करावयाच्या याच्या नियोजना संदर्भात त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील दक्षता विभागाची संबधित सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्ष पहाणी केली.


               कोरोनो आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या. बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तृप्ती सोनवणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांची उपस्थिती होती.