विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त कौशल्य विकसित करणे काळाची गरज - डॉ.उल्हास उढाण  


विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त कौशल्य विकसित करणे काळाची गरज - डॉ.उल्हास उढाण  


कोल्हापूर‌- आजच्या जागतिकीकरणाच्या व स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये एकापेक्षा अधिक कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्षण व सामाजिक विषयाचे अभ्यासक डॉ.उल्हास उढाण  यांनी केले. 


कौशल्य व उद्योजकता केंद्र  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी कौशल्य विकास आणि करियर या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.उढाण यांना निमंत्रित केले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.एच एम ठकार, कौशल्य विभागाचे समन्वयक डॉ. ए.एम गुरव,अॅड तुषार पाटील, कौशल्य विकास अधिकारी श्री महेश चव्हाण  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


पुढे बोलतांना डॉ.उल्हास उढाण म्हणाले की,प्रत्येक व्यक्तींमध्ये विविध प्रकारचे कला-गुण असतात.त्याचा शोध आपणास घेता आला पाहिजे.त्यासाठी शिक्षणाचा अर्थ समजून घ्यायला हवा.  दीर्घ काळाच्या प्रयत्नातूनच विविध प्रकारचे शोध लावण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले हा इतिहास समजावून घ्यायला हवा.म्हणून एखाद्या दुसऱ्या प्रयत्नातच मला घवघवीत यश प्राप्त व्हावं अशी अपेक्षा न ठेवता दीर्घकाळ योग्य प्रयत्न करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे, शिस्तीचे महत्व लक्षात घेणे, ऐकण्याची कला नीटपणे अवगत करणे,आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा योग्य तो अन्वयार्थ लावणे,सुक्षम निरीक्षण करणे आणि आपल्या मनात येणाऱ्या कल्पनेचा विकास करण्यासाठी कृतिशील व्हायला हवं.


रोज नवा विचार हे या गतिमान जगाचं सूत्र बनले आहे.याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायला हवी. डॉ.ठकार यांनी अध्यक्षीय समारोप केला.