राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई - कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या  व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी  असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील स्वस्त धान्य दुकानातील धान्य त्यांना तात्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आज वर्षा येथून व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधत होते. आज पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री  अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.


या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधतांना ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे, ही परिस्थिती नाईलाजाने उदभवली आहे.  आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे ,मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा.