महिलांचा सन्मान केला तर एकत्र कुटुंब पध्दती शाबूत राहील -मीराताई दीक्षित जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न


महिलांचा सन्मान केला तर एकत्र कुटुंब पध्दती शाबूत राहील -मीराताई दीक्षित
जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न


कराड -- एकत्र कुटुंब पध्दतीचा आनंद हा अवर्णनीय आहे. तेव्हा महिलांनी आपल्या कुटुंबातील महिलांचा सन्मान केला तर एकत्र कुटुंब पध्दती शाबूत राहील असे भ.प. मीराताई दीक्षित यांनीसांगून कुटुंबातील प्रत्येक घटकांचे कुटुंबातील महत्व समजावून सांगितले.


श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था मर्या.(जखिणवाडी), श्री मळाई महिला विकास मंच यांचे संयुक्त विद्यमाने स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मलकापूरच्या प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. प्रा. प्रिती घाटगे-देशमुख, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. मीराताई दीक्षित, तालुका आरोग्य अधिकारी.डाँ. अशोक वायदंडे, निर्भया पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील, शालिनीताई थोरात, डॉ.स्वाती थोरात, नगरसेविका निर्मलाताई काशिद, नूरजहाँ मुल्ला, डॉ. सारिका गावडे, अरूणादेवी पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पंचक्रोशीतील महिलांनाआर्थिक, वैद्यकिय,कायदेविषयक, ग्रहोपयोगी,सुजाण पालकत्व, स्वसंरक्षण, स्वयंसिद्धता अशा विविध रूपाने मार्गदर्शनपर तब्बल 40 महिला मेळावे घेवून स्री शक्तीचा जागर करणा-या श्री मळाई महिला विकास मंचचा दशकपूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


दशकपूर्ती महिला मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक .डाँ. स्वाती थोरात यांनी केले. महिला मेळाव्याचे आयोजन करण्यामागची भूमिका व श्री मळाई महिला विकास मंचच्या दहा वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. प्रा. प्रिती घाटगे म्हणाल्या,आजकाल मुळातच स्त्रीच स्त्रीलाच मान देत नाही.कारण स्री स्वतःतील स्व ओळखत नाही.दुसऱ्याचे स्व ओळखत नाही. तेव्हा स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मदतीचा हात दिला पाहिजे. तर दीपज्योति पाटील यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे महत्व समजावून सांगितले.


आदर्श ज्युनिअर काँलेजच्या विभागप्रमुख शीला पाटील , कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, सुरेखा खंडागळे, आदर्श मुख्याध्यापिका ज्योती शिंदे, आदर्श शिशु विहार मलकापूरच्या विजया पोटे , स्टार इंग्लिश मिडीयमचे व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रामचंद्र जाधव, करुणा शिर्के, स्वाती जाधव, शर्मिला श्रीखंडे, मुख्याध्यापिका लता नलवडे, रंजना काटवटे, महिला विकास मंचच्या सदस्या, पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थिंनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. 


मळाई महिला विकास मंचच्या सविता पाटील यांनी जीवनगाणे गातच रहावे हे गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिला विकास मंचच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले.संगीतशिक्षक मा.शरद तांबवेकर संगीत साथ दिली. सुत्रसंचालन सुरेखा खंडागळे आभार शिला पाटील यांनी मानले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image