सार्वजनिक ठिकाणी किटकनाशक फवारणी


सार्वजनिक ठिकाणी किटकनाशक फवारणी


कराड - कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेने शहरात प्रतिबंधात्मक उपायांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणे दिसिन्फेक्ट या कीटकनाशकाची फवारणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.


अधिकारी यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील उद्याने थेटर जिम क्लासेस बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशक फवारणी ही सुरू करण्यात आली आहे. कराड बस्थानक न्यायालय संकुल भाजी मंडई प्रितीसंगम उद्यान गुरुवार पेठ अशा गर्दीच्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात आली. नगरपालिकेत नागरिकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शहरात सार्वजनिक ठिकाणी किटकनाशक फवारणी करण्यात येत असून प्रीतिसंगम उद्यान, स्वर्गीय पी. डी. पाटील उद्यान बंद करण्यात आले आहे.


वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश शिंदे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सभापती विजय वाटेगावकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली पुंभार, मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते.डॉ. शिंदे यांनी कोरानाची माहिती देत मास्कचा जास्त गवगवा करू नये. अनावश्यक मास्क खरेदी करू नये, असे सांगत हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी उपस्थितांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image