कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरिता हॉटेल, ढाब्यांवर असणार प्रशासनाची नजर   - जिल्हाधिकारी शेखर सिंह


कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरिता हॉटेल, ढाब्यांवर असणार प्रशासनाची नजर   - जिल्हाधिकारी शेखर सिंह


सातारा - कोरोना या व्हायरसचा संसर्ग होवू नये यासाठी महामार्गावरील हॉटेल, ढाबे, लॉज यांच्या स्वच्छतेवर संबंधित विभागांचे प्रांताधिकारी वेळो वेळी पडताळणी करतील तसेच शहरातील जलतरण तलाव, हॉटेल, ढाबे आणि लॉज यांच्या स्वच्छतेबाबत नगर परिषदांचे मुख्याधिकारी वेळो वेळी पडताळणी करतील, या पडताळणी दरम्यान अस्वच्छता आढळल्यास हॉटेल, ढाबे आणि लॉज यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून सिल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी संयज भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.


कोणतेही धार्मिक कार्य आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे जर गर्दी होत असेल तर या कार्यक्रमासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेला  देण्यात येणाऱ्या  ना हरकत प्रमाणपत्रात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असणार आहे.


कोरोना संसर्गाबाबत विविध समाज माध्यमांतून अनेक अफवा पसरत आहे, अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कडकर करवाई केली जाणार जाणार आहे. कुणी अफवा पसरवित असल्यास 02162-233833 व 02162-232175 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 


कोणीतरी   न्यूज 18  लोकमत वर सातारा - पुसेगाव मध्ये Corona चे रुग्ण आढळले अशी खाडाखोड करून  बातमी व्हायरल केली आहे. ही बातमी व्हायरल करणाऱ्याचा शोध लागला असून संबंधितावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.