ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलासा अर्जासाठी असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये सूट- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलासा अर्जासाठी असलेल्या जातपडताळणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये सूट- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ


मुंबई -  जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करु न शकणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तरी निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. राज्य विधानसभेनंतर विधान परिषदेने याबाबतचे ग्रामविकास सुधारणा विधेयक बुधवारी एकमताने मंजूर केले. त्यानंतर राज्यपालांनीही या सुधारणेस मान्यता दिली असून अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.


काल याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत  मांडण्यात आले होते.


या सुटीचा लाभ घेऊन उमेदवारी अर्ज भरलेला संबंधीत उमेदवार निवडून आल्यास पुढील वर्षभरात त्याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.


सध्या राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना जातपडताळणी प्रमाणपत्र देणे सध्या बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत. इतक्या कमी काळात त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही. आता संमत झालेल्या या विधेयकानुसार अर्ज भरल्याचे टोकन किंवा सत्य प्रत दाखवली तर उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरता येईल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना याचा लाभ होणार आहे व त्यांचा निवडणुकीचा हक्क डावलला जाणार नाही, असे ते म्हणाले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती