ईडो कांऊटसह सिद्धगिरी हॉस्पिटल चे विरेंद्र वणकुद्रे अनुबोध पुरस्काराने सन्मानीत..... डॉ. कुमार सप्तर्षी च्या हस्ते गौरव सोहळा
गारगोटी - औद्योगिक क्षेत्रात आदर्शवत जलव्यवस्थापन आणि निसर्ग पूरक कार्यरत कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील इंडो काउंट स्पिनिग मिल, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार किरण मस्कर आणि सिद्धगिरी हॉस्पिटल चे नेत्र विभागाचे डॉक्टर वीरेंद्र वणकुद्रे यांच्यासह शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवरांना अनुबोध गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, बजरंग देसाई सह मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख असलेल्या गारगोटीतील शाहू वाचनालायात सोहळा संपन्न झाला.
समाजातील सकारात्मकता वाढवण्यासाठी रचनात्मक काम करणाऱ्या योग्य वेळी सत्कार हा मोलाचा आणि त्यांच्या कार्याला गती मला देणार असतो अशा शब्दात डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सलग सातव्या वर्षी अनुलोम मासिकाने सातत्याने प्रबोधन व्याख्यानासह गौरव सोहळा सलगपणे सुरु ठेवला असून भविष्य त्याची व्याप्ती सगळ्याच्या सहभागाने वाढवली जाईल असा विश्वास सर्वांचे स्वागत करताना सांपादक मिलिंद प्रधान यांनी व्यक्त केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्तै- शोध पत्रकार कीरण मस्कर ,मनोजकुमार पवार - सातारा ,ज्येष्ठ निवेदक टि.बी.पाटील यांना ही सन्मानीत करण्यात आले.
जबाबदारी वाढवणारा हा पुरस्कार असून सिद्धीगिरी हॉस्पिटलच्या सर्व समर्पित घटकांचा हा सन्मान आहे .रोटरी सनराईज ने देगणी दिलेल्या अघावयत फिरत्या आय लँब मधून गत आठ वर्षौत सत्तर हजाराहून अधिकाचे थेट डोळे महानगरी मुंबई ते तळकोकणापर्यत डोळे तपासण्यासह पाच हजाराहून अधिक मोतीबिंदूसह डोळ्याची आँपरेशन करण्याचे भाग्य, प.पू.अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीच्या प्रेरणा आणि वेळोवेळीच्या मार्गदर्शनाने लाभले.अनुलोमच्या पुरस्काराने यांची दखल घेत, भविष्यात अधिक व्यापकतेने काम करण्यासाठीच प्रौत्साहीत केले आहे. अश्या शब्दात आपल्या भावना सिध्दगिरी हाँस्पीटल वतिने डाँ.विरेंद्र वणकुद्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केला.
अचानक मंत्रालयातील मिंटींगसाठी मुंबईस गेल्याने कोल्हापूर चेंबर आँफ काँमर्स चे अध्यक्ष संजय शेटे - माजी अध्यक्ष आनंद माने हे ऊपस्थित राहू शकले नाहीत. त्याच्या शुभेच्छापर भावना राजेंद्र मकोटे यांनी व्यक्त केल्या. या सोहळ्याचे सुत्रसंचलन पत्रकार सुनील सांमत यांनी केले तर आभार डाँ.अस्मिता प्रधान यांनी मानले.या सोहळ्यासा ज्येष्ठ विचारवंत डाँ. सुभाष देसाई सह शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.