अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना पेट्रोल बंद


अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना पेट्रोल बंद


सातारा -  कोरोना विषाणुच्या प्रादर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनाई केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपावर कोणालाही पेट्रोल मिळणार नाही. 


अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या खासगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तु व सेवा संदर्भात कार्य करणारी खासगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान कोणत्याही खाजगी व्यक्तीला त्याच्या खाजगी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.