निफा व सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे गरजु लोकांना जेवण

निफा व सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे गरजु लोकांना जेवण


 नांदेड - सध्या कोरोना मुळे नांदेड शहरात संचारबंदी सुरु आहे. संचारबंदी कधी उठेल हे सांगता येत नाही. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी,  पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी मोठया प्रमाणात 24 तास कार्यरत आहेत. त्यांच्या भोजनाची मोठी गैरसोय होत आहे. हॉटेल व खानावळ बंद असल्यामुळे बाहेर गावाहून नांदेड मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन मिळत नाही.तसेच अनेक निराधारांना भोजन देण्याची नितांत आवश्यकता आहे.


त्यामुळे शुक्रवार दि. 26 मार्च पासून संचारबंदी उठे पर्यंत नांदेड शहरात निफा व सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे जेवण देण्यात येत आहे.  निफा व सप्तरंग सेवाभावी संस्था विविध सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असते आता सुद्धा संचारबंदी मध्ये  सुद्ध जेवण पुरविण्यात येत आहे.  सद्या संचारबंदी कळत देखील  मोठ्या प्रमानात गरजु जे दररोज उदर निर्वाह करतात ऐसे अनेक जणना जेवण देण्याच काम ही संस्था करीत आहे.


पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या तर्फे परवानगी घेऊन स्वतःची काळजी घेत सर्वाना जेवण पुरवन्यच काम या संस्थचे स्वयं सेवक करीत आहेत या मध्ये प्रदेश अध्यक्ष डॉ भरत जेठवाणी, जिल्हाअध्यक्ष भास्कर डोईबळे,शुभम भारतीय, साईनाथ कुलथे, आकाश बागडे, नईम खान, सुनील बडकलु, जगदीश जेठवाणी, दाईम कुरेशी इत्यादी जणांनी सहकार्य केलं.