काल पर्यंत दाखल केलेल्या पाचही अनुमानित युवकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ..आज एका आरोग्य कर्मचाऱ्याला केले दाखल

काल पर्यंत दाखल केलेल्या पाचही अनुमानित युवकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ..आज एका आरोग्य कर्मचाऱ्याला केले दाखल


कराड - काल रात्री उशिरा पर्यंत पाच  युवकांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांचे एनआयव्ही कडे पाठविलेले रिपोर्ट आताच प्राप्त झाले असून त्या पाचही युवकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे ते  कोरोना संसर्गित नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


बहामा,  दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे  आलेला 27 वर्षीय युवक व काही वेळ त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र वय 24 वर्षे  त्या दोघांनाही  सर्दी व  खोकला असल्याने त्यांना दि. 21 मार्च रोजी  रात्री 11 वा. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला 24 वर्षीय युवक त्याला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री  1 वा. विलगीकरण कक्षात दाखल केले होते. यापूर्वी चिली येथून आलेल्या 24 वर्षीय युवकास व  दुबई येथून आलेल्या 29 वर्षीय युवकास  दाखल करण्यात आले होते.


तथापि आज एका आरोग्य कर्मचाऱ्याला काही लक्षणांमुळे आज अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत विलगीकरण कक्षात एकूण 10 जणांना ठेवण्यात आले असून त्यातील 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि आज दाखल केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात पाठवला आहे, अशी माहीतीही डॉ.गडीकर यांनी दिली आहे.


 


Popular posts
१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध
साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी प्रा.अभय जायभाये रुजू
Image