टिळक हायस्कूलचे व्हाँटस अँपद्वारे स्काँलरशिपचे मार्गदर्शन

 


टिळक हायस्कूलचे व्हाँटस अँपद्वारे स्काँलरशिपचे मार्गदर्शन


कराड -   संपूर्ण देशात 23 मार्च पासून कोरोनाचा धोका लक्षात घेऊन लॉक डाऊन करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम सोडवणे,  प्रश्नपत्रिका सोडवणे इत्यादी उपक्रम देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून  येथील शिक्षण मंडळाच्या टिळक हायस्कूल ने इयत्ता पाचवी व आठवीच्या 117  विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षेची तयारी व्हॉट्सअँप द्वारे करून घेऊन सुट्टीचा सदुपयोग केला आहे़ .  


दररोज किमान तीन तास पुरेल एवढा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने दिला जातो .  जे विद्यार्थी  सहभागी होऊन 100%  दिलेला अभ्यासक्रम सोडवतील त्यांच्यासाठी खास बक्षीस योजनाही ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.


23 मार्च पासून संपूर्ण देशात लाँक डाऊन असल्याने विद्यार्थी व शिक्षक घरीच आहेत. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना कंटाळवाणी वाटू नये यासाठी शिक्षण मंडळ कराडच्या टिळक हायस्कूलने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी  व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. याद्वारे भाषा, गणित, बुद्धिमत्ता सामाजिक शास्त्र, इत्यादी विषयांचा अभ्यास दररोज व्हाट्सअप वर दिला जातो. दररोज किमान तीन तास  पुरेल एवढा अभ्यास याद्वारे दिला जातो. स्कॉलरशिप विषयाच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दररोज नवीन  प्रश्नपत्रिका तयार करून देण्यात येतात.  प्राप्त प्रश्नपत्रिका सोडवताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास विद्यार्थी आपल्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप वरती शिक्षकांना अडचणी विचारतात. व शिक्षक ही तत्काळ त्या शंकांचे निरसन करत असल्याने विद्यार्थी व पालकांच्या समाधानाचे वातावरण आहे.


व्हाँट्सअँप ग्रुप वरती संबंधित विषयाचे शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान तत्काळ होत आहे. मराठी विषयाचे व्याकरण, गणित विषयातील सूत्रे, काही क्लुप्त्या, बुद्धिमत्ता विषयाची आधुनिक तंत्र याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा वापर करून  येथोचित मार्गदर्शन करत असल्याने त्यांच्या शंकांचे निरसन लगेच होत आहे. या उपक्रमाचे कौतुक सर्व पालक वर्गातून होताना दिसत आहे.


"मीच माझा रक्षक" ची भूमिका  सर्वजण सर्वजन पाळत आहेत. लाँक डॉऊन मुळे  शासनाने शाळाऩा सुट्टया जाहीर केल्या आहेत.वेळेचा सदुपयोग करावा यासाठी" वर्क फ्रॉम होम स्टडी "ही नवीन संकल्पना अमलात आणली आहे. स्कॉलरशिप विभाग प्रमुख सौ.भोसले एम.एस यांनी स्कॉलरशिपच्या मूलभूत संकल्पना यावर आधारित  गृहकार्य तयार केली आहेत इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित एन.सी. ई.आर.टी .च्या धरतीवर हे  गृहकार्य तयार केले आहे. मराठी, इंग्रजी , बुद्धिमत्ता व सामाजिक शास्त्रे गृहकार्य तयार करून दररोज व्हाँट्सअँप ग्रुप वर दिले जाते.   कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या सुट्टीचा सदुपयोग व्हाट्सअप द्वारे ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या समाधानाचे वातावरण आहे. 


अनेक पालकांनी या उपक्रमाचे ऑनलाइन कौतुक ही केलेले आहे. पाचवी साठी एस एस कुलकर्णी, ए.एन भांदिर्गे, सौ. जे आर ननवरे. सौ कसबे मॅडम, आठवीसाठी सौ. एम एस भोसले, सौ.एस. एस खामकर जे. एस. पवार.  व्ही.बी बोधे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक जी.जी .अहिरे. उपमुख्याध्यापक के. पी. वाघमारे, पर्यवेक्षक एस, एस, शिंदे. यु. व्ही. बाबर अधिक मार्गदर्शन करत आहेत.


 


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image