खा श्रीनिवास पाटील मदतीसाठी आले पुढे....जीवनावश्यक वस्तूंची 1000 किट सुपूर्द


खा श्रीनिवास पाटील मदतीसाठी आले पुढे....जीवनावश्यक वस्तूंची 1000 किट सुपूर्द


कराड : लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरांची उपासमार होऊ नये म्हणून पुणे येथील एस. बालन ग्रुप व श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने कराड तालुक्यातील मजूर व गरजूंसाठी जीवनावश्यक वस्तूंची 1000 किट देण्यात आली.


कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लाॅकडाऊन करण्यात आल्याने सध्या सर्व काही ठप्प झाले आहे. यामध्ये हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाचे मोठे हाल होत आहेत. अशा अडचणीच्या काळात त्यांना मदत व्हावी म्हणून कराड तालुक्यातील मजूर व गरजूंसाठी एस. बालन ग्रुप, पुणे व श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाऊंडेशन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. साखर, तांदुळ, मैदा, खाद्यतेल, चटणी आदी जीवनावश्यक वस्तू यामध्ये देण्यात आल्या आहेत. स


परिस्थितीत मजूरवर्गाची निकडची गरज ओळखून खा. श्रीनिवास पाटील यांनी एस.बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांचेकडे मदतीसाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एस. बालन ग्रुप व श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाऊंडेशन यांचेकडून देण्यात येणा-या या वस्तूंच्या 1000 किटचे वाटप शासकीय यंत्रणेकडून होणार आहे. त्यापैकी पहिले 500 किट प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अमरदिप वाकडे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.