सातारा 12 तर फलटण 13 अनुमानित रुग्ण दाखल
सातारा : काल दि. 9 एप्रिल रोजी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय सातारा येथे 15 ते 20 वयोगटातील बारा पुरुषांना कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच फलटण उप जिल्हा रुग्णालयात 3 ते 90 वर्ष वयोगटातील तेरा जणांना ( 6 पुरुष व 7 महिला) कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 25 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.