पुणे येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ,  58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 86 जणांना केले दाखल


पुणे येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ,  58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 86 जणांना केले दाखल
 
सातारा  : पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल  रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


या रुग्णावर पुढील उपचार   क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे करण्यात येणार आहे. 
आता सातारा जिल्ह्यात 36  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 5 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


  तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कोल्हापूर, सांगली सातारा या जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भाबाबत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री श्री रमेश जारकीहोळी व महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची बैठक
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image