कोरोनाच्या संकटकाळात आ. पृथ्वीराजबाबांचा लाऊडस्पीकर वरून ग्रामस्थांशी संवाद


कोरोनाच्या संकटकाळात आ. पृथ्वीराजबाबांचा लाऊडस्पीकर वरून ग्रामस्थांशी संवाद


कराड : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरत आहे. आपल्या देशातही साडे सहा हजारांवर कोरोनाग्रस्थ आहेत तर महाराष्ट्रात हा आकडा १३०० च्या जवळ पोहचला असताना आपल्या सातारा जिल्ह्यात ६ जण कोरोना बाधित आहेत. अश्या परिस्थितीत पोलीस प्रशासन, डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, आशा तसेच अंगणवाडी सेविका असे सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत कि कोरोनाग्रस्थांचा आकडा लवकरात लवकर नियंत्रणात यावा. यासाठी लोकांनी घरात राहणे अत्यंत गरजेचे असताना लोक काही ना काही कारणाने घराबाहेर पडताना दिसत आहेत. याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः मतदारसंघातील गावागावात जाऊन जनतेशी लाऊड स्पीकर द्वारे संवाद साधत जनजागृती करत आहेत. 


देशात लाॅकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय भुमिका बजावावी असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यापार्श्वभुमीवर आ पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींसमोर आदर्श घालून दिला आहे. चव्हाण यांनी मतदार संघातील वाड्यावस्त्यांवर जाऊन ध्वनीक्षेपणावरुन कोरोनाबाबत नागरिकांत जागृती केली आहे. कोरोना विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण फिल्डवर उतरुन लढत असल्याने आता त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. कराड तालुक्यातील ग्रामीण भागात काही कोरोनारुग्ण सापडल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. मात्र चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन नागरिकांना धीर दिला आहे. 


याचसोबत आ पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेला संवादाद्वारे संदेश दिला कि, कोरोनापासून बचावासाठी कोण-कोणती काळजी घेणे गरजेचे आहे हे सांगितले तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे कारण ते आपल्यासाठी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडलेले आहेत. सध्या लॉकडाऊन च्या काळात घरात बसणे जरी कठीण असले तरी स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवासाठी आपल्याला घरी राहणे गरजेचे आहे असे कळकळीचे आवाहन आ पृथ्वीराज चव्हाण यांनी या संवादाद्वारे जनतेला केले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, नरेंद्र पाटील, पै तानाजी चौरे, नितीन थोरात तसेच युवा नेते इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.


 


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image