कराडमध्ये ६५० लोक बाहेरगावचे, 33 परदेशी नागरिकांची नोंदणी : मुख्याधिकारी यशवंत डांगे... 12 हजार 500 घरांमधील 60 हजार लोकांचा सर्वे पुर्ण 


कराडमध्ये ६५० लोक बाहेरगावचे, 33 परदेशी नागरिकांची नोंदणी : मुख्याधिकारी यशवंत डांगे...
12 हजार 500 घरांमधील 60 हजार लोकांचा सर्वे पुर्ण 


कराड - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्यावतीने नागरी आरोग्य केंद्राने सर्वे केला आहे.कराडमध्ये 650 लोक परगावाहून आलेले आहेत.तर 33 परदेशी नागरिकांची नोंदणी झाली आहे. कराड मधील 12 हजार 500 घरांमधील 60 हजार लोकांचा सर्वे पुर्ण झाला असून उर्वरित कराडमधील घरांचा व लोकांचा सर्वे लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली आहे.


कराडमध्ये पुण्या-मुंबईहून आलेल्या व परदेशातून आलेल्या नागरिकांना स्टॅम्पिंग करण्याचे कामही नगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात येत असून त्यांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. येणारे पाच सहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असून काळजी करण्यासारखे आहेत. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये. कराडमधील नागरिकांना प्रत्येक प्राथमिक सुविधा म्हणजेच भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू घरपोच मिळतील त्यादृष्टीने नियोजन केले असून विनाकारण कोणतेही कामाचे निमित्त करून कृपया नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.


कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीचा विचार करता कराडमध्ये सर्व दक्षता घेतल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर औषध फवारणीचे काम सुरू आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन खाजगी दवाखाने सुरू करण्याच्या सूचना केली असून कराड मधील सर्व खासगी दवाखाने सुरू आहेत. दरम्यान अत्यावश्यक व जरुरीचे असेल तरच दवाखान्यात जावे. अन्यथा दवाखान्याच्या निमित्ताने घराबाहेर पडून फिरू नये व दवाखान्यात ही अनावश्यक गर्दी करू नये. असेही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कराडकरांना व परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे.