साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू


साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह;
4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू


कराड : काल दि. 3 एप्रिल रोजी सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल असणाऱ्या 4 अनुमानित व सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल असणार एक असे एकूण 5 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट एन. आय. व्ही. पुणे यांनी निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे.


आज रोजी सातारा जिल्हा रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 24 वर्षीय पुरुष तर कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड येथे बाधीत रुग्णाच्या सहवासीत म्हणून 2 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे एक नऊ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व चार रुग्णांच्या घशातील स्त्राव पुणे एन. आय. व्ही. येथे पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी नऊ महिने बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.
                                            
दिनांक 4.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी 


1.      एकूण दाखल -     171
2.      जिल्हा शासकीय रुग्णालय- 81
3.      कृष्णा हॉस्पीटल, कराड-  88
4.      खाजगी हॉस्पीटल- 2
5.      कोरोना नमुने घेतलेले-   171
6.      कोरोना बाधित अहवाल -    2
7.      कोरोना अबाधित अहवाल -   164
8.      अहवाल प्रलंबित -        4
9.      डिस्चार्ज दिलेले-       164
10.     सद्यस्थितीत दाखल-       7
11.     आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.4.2020) -        644
12.     होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 644
13.     होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -   463
14.     होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती –  181
15.     संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-     58
16.     यापैकी डिस्जार्ज केलेले-        25
17.     यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0


 


Popular posts
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image