सातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल


सातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल


सातारा   : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा असे एकूण 2 जणं पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


आता सातारा जिल्ह्यात 33  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


तसेच आज दि. 29 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 18, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 11 असे एकूण 63 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश