65 व 27 वर्षे पुरुष कोरोना बाधित.. 4 नागरिकांचे अहवाल अनिर्णीत तर 27 जण निगेटिव्ह.... 36 जण कक्षात दाखल


65 व 27 वर्षे पुरुष कोरोना बाधित.. 4 नागरिकांचे अहवाल अनिर्णीत तर 27 जण निगेटिव्ह.... 36 जण कक्षात दाखल



कराड : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 65 वर्षीय व 27 वर्षीय पुरुषांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
आता सातारा जिल्ह्यात 16 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ही सगळी मिळून जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 झाली आहे.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 5, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 27 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 3 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 1 असे एकूण 4 नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे. 


दि. 23 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा अुमानित म्हणून 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 5, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 19 असे एकूण 36 अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या दाखल असणाऱ्या 2 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर तपाणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह असल्याने 48 तासांनी पुनर्तपासणीकरिता बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे येथे पाठविण्यात येत आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.