दहा महिन्यांचे बाळ आणि 73 वर्षाच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त.... कोरोना बाधित तिघांना आज सुखरूपपणे घरी पाठविले...कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या अथक प्रयत्नांना अभूतपूर्व यश


दहा महिन्यांचे बाळ आणि 73 वर्षाच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त.... कोरोना बाधित तिघांना आज सुखरूपपणे घरी पाठविले...कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या अथक प्रयत्नांना अभूतपूर्व यश


कराड - सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण (ता. पाटण) येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह ओगलेवाडी (ता. कराड) येथील 28 वर्षीय युवक झाला कोरोनामुक्त झाले आहेत.तिन्ही रुग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे.


कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने केलेल्या योग्य व यशस्वी उपचाराने तिन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत.तिन्ही कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे कराड कोरोनाबाधित म्हणून हॉटस्पॉट होत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्ती मध्येही कराड पुढे जाऊ लागले आहे. हा सकारात्मक बदल कराड तालुक्यासाठी समाधान कारक आहे.


बधितांमध्ये जिल्ह्याचा आकडा 41 तर कराड 30 वर पोहीचले असताना बुधवारी कृष्णातून 3 जण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहे. 15 एप्रिलला एकाच दिवशी जिल्ह्यात 4 जण बाधित सापडले होते. त्यातील हे तिघे आहेत.


दहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. पाटण तालुका कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या पाटण तालुक्यात एक दहा महिन्याचे बाळ बाधित असल्याचे लक्षात आले होते. अवघ्या 10 महिन्याच्या बाळाने कोरोना विरोधातला लढा जिंकला आहे. त्याचे 14 व 15 दिवसांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने बाळाला घरी सोडण्यात आले आहे.


73 वर्षं वयाच्या आज्जीबाई कोरोनामुक्त झाल्या आहेत. उंडाळे खोऱ्यातील दुर्गम महारुगडे वाडीत एक बाधित रुग्ण होता. त्याचा कोरोनाने बळी घेतला नंतर त्याच्या 73 वर्ष वयाच्या आईला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. ज्या कोरोनाने मुलाला नेले त्याच कोरोनावर या आज्जीबाईंनी मात केली आहे.


ओगलेवाडीसाठी गुड न्यूज रेल्वे कर्मचारी झाला कोरोनामुक्त झाला आहे. मूळचा बिहार येथील रहिवासी पण बेळगाव येथील बाधित रुग्णाच्या संपर्क मध्ये आल्याने बाधित झालेला रेल्वे कर्मचारी बुधवारी कोरोनामुक्त झाला. ओगलेवाडी परिसर सध्या प्रचंड काळजीमध्ये असताना त्या भागाला ही सर्वात मोठी आनंदाची व समाधानकारक बातमी आहे. एकूणच, सातारा जिल्ह्यात आज एकाच दिवशी 10 महिन्याचा बाळापासून ते 73 वर्ष्याच्या आज्जीबाईंपर्यंत तिघांनी कोरोनाचा लढा जिंकला आहे.


 


.