पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक


पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक


कराड - कोरोना(कोविड १९) या विषाणूचा संसर्ग कराड, मलकापूरसह परीसरामध्ये झपाट्याने वाढू लागला आहे. यापार्श्वभूमीवर  शासकीय विश्रामगृह कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक संपन्न झाली.


प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, तहसीलदार अमरदीप वाकडे, डीवायएसपी सुरज गुरव, पोलीस निरीक्षक कराड बी.आर.पाटील, पोलीस निरीक्षक कराड ग्रामीण किशोर धुमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख, ए. पी.आय उंब्रज अजय गोरड, ए. पी.आय.तळबीड श्रीमती जयश्री पाटील यांच्या समवेत चर्चा करून सद्य परिस्थितीची व कोरोना बाधित रुग्णांची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली.


त्याचबरोबर कराड नागरी आरोग्य केंद्राच्या नर्सेस व आशा या ताप, सर्दी, खोकला (ILI व SARI) ही लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध ग्रहभेटीद्वारे घेत आहेत का, व अशा लक्षणांचे रुग्ण लवकरात लवकर घशाचा नमुना घेणासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड त्वरित पाठवले जात आहेत का आदी. बाबींविषयी चर्चा केली.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती