महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी 


महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी 


कराड - जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे  पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमवेत चर्चा  केली. यामध्ये पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना शेतीकामासाठी डिझेल देण्या संदर्भात तसेच मेडिकल, किराणा दुकान व पालेभाजी यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुविधांबाबत चर्चा  केली.


यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर आदी उपस्थित होते.



Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश