स्वकष्टाच्या कमाईतून विक्रम जाधव याने मास्क व हँडवांश केले वाटप


स्वकष्टाच्या कमाईतून विक्रम जाधव याने मास्क व हँडवांश केले वाटप


कराड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचे व आपल्या कुटुंबियांचे आपल्या प्रभागाने सुरक्षित रहावे, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने कामे करत आहेत. रविवार पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम जाधव यांनी कष्टातील पैशातून रविवार पेठेतील प्रभागातील नागरिकांना मास्क व हँडवांश वाटप करून सामाजिक कृतज्ञता अथवा सामाजिक संवेदना विक्रम जाधव यांची दिसून आले आहे.कोणताही गाजावाजा न करता केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाला रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, दक्षता, सूचनांचे पत्र ही संपूर्ण प्रभागांमध्ये प्रत्येक घरात वाटण्यात आले आहेत.


सामाजिक कार्यकर्ते विक्रम जाधव यांच्या कौतुकास्पद व गौरवास्पद कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी आपला खारीचा वाटा उचलणारा सामाजिक कार्यकर्ता असावा तर विक्रम जाधव याच्यासारखा.स्वकष्टातून मिळविलेल्या पैशातून प्रभागातील नागरिकांची काळजी घेणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून विक्रम जाधव यांचे संपूर्ण प्रभागात कौतुक होत आहे.


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून आपण स्वतःचे संरक्षण नक्कीच करू शकतो. यासाठी मास्कचा वापर करावा. त्याचप्रमाणे साबण किंवा हँड वॉशने हात सातत्याने स्वच्छ धुवावे, शिंकताना किंवा खोकतांना आपल्या नाक आणि तोंडावर रुमाल धरावा, मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळा. अशा पद्धतीने स्वतःची काळजी घेऊन या आजाराला नक्कीच रोखू शकतो. यासाठीच आज आपल्या प्रभागातील नागरिकांना विक्रम जाधव ( VJ) मित्र परिवाराच्या वतीने मोफत मास्क आणि हँडवांश वाटप केले आहे.


वेळ वाईट आहे... सध्याचा काळ भयानक आहे. संपूर्ण जग सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढतय. काळ कसोटीचा आहे. पण...या लढाईत आपण नक्की जिंकू. सतर्क रहा...काळजी घ्या. असा संदेश विक्रम जाधव (VJ) व मित्र परिवार यांनी दिला आहे. जोखीम पत्करु नका. आपल्या माणसांच्या संपर्कात रहा.आपल्याला कोरोनाशी लढायचय पण न घाबरता सरकारच्या सुचनांचे पालन करा. कोरोनाला घाबरू नका, परंतु काळजी घ्या..!!असे आवाहन विक्रम जाधव (VJ) व मित्र परिवार केला आहे.