अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 


अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 


कराड - कराड तालुक्यातील केसरी कार्डधारकाना नम्र विनंती, 
केंद्र शासनाकडून आलेल्या अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्ड धारक यांना प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी योजनेमार्फत मोफत तांदूळ वाटप सुरू झाले आहे. हे फक्त ऑनलाइन फीडिंग असलेल्या (12 अंकी नंबर असलेल्या) कार्डधारका साठीच आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. 


तसेच ग्रामीण भागातील केसरी ( प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) या योजनेत सामाविस्ट असलेल्या कार्डाचे वार्षिक उत्पन्न हे जास्तीत जास्त 44000 ( चवेचाळीस हजार ) पर्यंत असावे लागते. इतर सर्व केसरी कार्ड ही APL या योजनेत मोडतात. व या योजनेकरता वार्षिक उत्पन्न हे 45000 ( पंचेचाळीस हजार ) ते 99000 (नव्यानव हजार ) एवढे असते. APL साठी राज्यशासनाकडून माहे मे व जून या महिन्यात प्रति व्यक्ति 3 किलो गहु 8 रुपये प्रतिकिलो दराने, व 2 किलो तांदूळ 12 रूपये प्रति किलो दराने देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. असेही तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले


इतर सरकारी आणि नीमसरकारी तसेच पेंशनधारक यांचा समावेश हा ( पांढऱ्या कार्डमध्ये ) शुभ्र शीधापत्रिकेत करण्यात येतो. या कार्डसाठी कोणतेही धान्य शासन देत नाही. यांचे वार्षिक उत्त्पन १ लाखाचे वर असते, याची सर्वानी नोंद घ्यावी.कृपा करुन ऑनलाइन फीडिंग नसलेल्या कार्डधारकाने दुकानदारासोबत वाद घालु नये. तसेच कोणाचे केसरी ( प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) या योजनेत सामाविस्ट असलेल्या कार्डाचे ऑनलाइन फीडिंग राहिलेले असल्यास लॉकडाउन संपल्यानंतर सर्व कागदपत्र पडताळून फीडिंग केले जाईल. सर्व कार्डधारकाकडून योग्य सहकार्य होईल अशी अपेक्षा तहसीलदार अमरदीप पोकळे यांनी व्यक्त केले आहे. 


शासनाचे सर्व गरजू कार्डधारक यांना पूर्ण सहकार्य आहेच. पण सर्व माहित असताना रेशन दुकानात येऊन दुकानदार यांना धान्य मिळालेच पाहिजे, असा आग्रह करू नये, गरीबाना कल्याणकारी योजनेमार्फत मोफत तांदूळ वाटप हे गावकृती समिती, सरपंच, व तलाठी यांच्या उपस्थितित होत असते, वरीलप्रमाणे माहिती समजून घ्यावी विनंती विनंतीही तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी केली आहे.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image