"तुमची काळजी आम्ही करतोय" नगरसेवकांची हमी

 



"तुमची काळजी आम्ही करतोय" नगरसेवकांची हमी


कराड - काल महारुगडेवाडी (ता.कराड) येथील 45 वयाच्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी नजीक अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कोरोना बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कार बाबत पूर्ण गुप्तता पाळण्यात आली होती. तर सकाळी साडेआठच्या सुमारास सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे या घटनेची कोणालाही ही माहिती नव्हती. कराड नगरपालिकेच्या जानबाज व जिगरबाज कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्काराचा सर्व सोपस्कार पार पाडला.प्रशासनाने अंत्यसंस्कारावेळी कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुरक्षेच्यादृष्टीने किट दिले होते.


दरम्यान कोरोना बाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अराणके मंगल कार्यालय परिसरातील नागरीकांमघ्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांना परीस्थितीची माहिती देऊन लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर यांच्या माघ्यमातुन यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्याशी बोलणे करुन त्याच्याकडे असणारा फवारणीच्या ट्रकटरने स्मशानभुमी परिसर, गवळवेस, गणपती मंदिर, भैरोबा गल्ली, श्री दत्त मंदिर, पाण्याची टाकी, कुंभारवाडा, पावसकर गल्ली, मोरयाअपार्टमेंट आणि मोहल्ला परीमल, एकांडे बोळ, सुतारवाडा, कृष्णाबाई कार्यालय, कोट भाग, पत्राचाळ, श्रीघर प्रेस, गरुड घर असा सगळा परीसर औषध फवारणी केली आहे.


दरम्यान सदर व्यक्तीचे ने-आण या परिसरातून झाल्यामुळे आणि कराड येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार झाल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज, भीती निर्माण झाली होती. कोरोना व्हायरसचा संसर्ग या परिसरात होऊ नये. यासाठी सर्वत्र औषध फवारणी करण्यात आले आहे.नागरिकांच्या आरोग्याची संपूर्णपणे काळजी घेतली जात आहे. यामुळे नागरिकांनी घाबरू नये. अथवा गैरसमज करून घेऊ नये असे आवाहनही राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, वाटेगावकर यांनी नागरिकांना केले आहे.