कराड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ.... कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे


कराड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ.... कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे


कोरोना संसर्ग हा कोणालाही क्षमा करीत नाही. कारण कोरोना टाळणेसाठी शासनाच्या सूचनांचे पालन करणे हे आपल्या हातामध्ये आहे. कराड शहर सध्या अतिशय सुस्थितीत आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत कराड नगरपालिका प्रशासनाने अतिशय उत्तम व चांगले काम केले आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. यासाठी आवश्यक खबरदारी व उपाय योजना वेळीच केल्यामुळे कराड शहर सध्यातरी कोरोनापासून दूर आहे. कोरोना बाधितांची संख्या पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. कारण हे लोण आता कराडमध्ये येईल की काय ? अशी भीती नागरिकांच्यात निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाची साखळी तोडणे महत्त्वाचे आहे.


सातारा जिल्ह्यांच्या कोरोना बाधित रूग्णांची संख्या 42 अशी आहे. कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण 30 आहेत. याचा आता सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा. कराड तालुक्यातच का वाढते आहे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ? राज्य शासन व जिल्हा प्रशासन दक्ष व कार्यक्षम असताना कराड तालुक्यातच कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आहे ? वास्तविक कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. कार्यक्षमपणे काम करताहेत. नागरिक देखील सहकार्य करीत आहेत.प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे हे सध्या कोरोनाला थांबवणे करीता आपल्या हातात आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनंच्या काळामध्ये अनावश्यक घराबाहेर न पडणे, यामुळे कोरोनाची साखळी तोडता येईल असे प्रशासनाचे मत आहे.


कराडला लागून असणाऱ्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वनवासमाची व आगाशिवनगर येथे रुग्ण आहेत. ग्रामीण भागात असणाऱ्या रुग्णांना झालेल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन कसोशिचा प्रयत्न करीत आहे. सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, कराड शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील हे अधिकारी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्याबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाय योजना करीत आहेत.


आगाशिवनगर येथील दोन दिवसांची बाळंतीणचा अहवाल पॉझेटिव्ह आला. संबंधित गरोदर महिला 24 एप्रिलला कराड उपजिल्हा रूग्णालयांत दाखल होऊन 25 ला प्रसूत झाली. तीने मुलाला जन्म दिला. शासनाच्या नव्या नियमांप्रमाणे सर्वच बाळंतीणींचे स्त्राव तपासणीसाठी दिले होते. त्यात हा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. दरम्यान, उपजिल्हा रूग्णालयाच्या ती दाखल असलेल्या जनरल वॉर्डमध्ये एकुण 24 महिला उपचार घेत होत्या. तर त्यांच्यावर कित्येक डॉक्टर्रस् व परिचारिका उपचार करत होते. कराड शहराच्या मध्यभागी हे कोरोना केअर सेंटर आहे. हि परिस्थिती समोर आल्याने घबराहटीमध्ये वाढच होत आहे. 


वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कराड तालुक्यातसह चांदोली परिसरातील गोरगरीब जनता उपचारासाठी येत असतात. विशेषता गरोदर स्त्रिया बाळंतपणासाठी या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात येतात. याचठिकाणी "कोरोना केअर सेंटर" आहे. कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल येथे सुसज्ज असे कोरोना बाधित रुग्णांच्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असताना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील "कोरोना केअर सेंटर" मध्ये सध्या रुग्ण का ऍडमिट केले जातात ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे कराड शहराच्या मध्यवस्तीतमध्ये आहे. मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरता ठेवणे योग्य आहे का ? समाजातील गोरगरीब, गरजू लोक हे या ठिकाणी उपचारासाठी येत असतात यामुळे याठिकाणी कोरोना संसर्ग तपासणीचे केंद्र म्हणजे कोरोनाचा अधिक फैलाव होण्याची शक्यता असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.


गोरख तावरे, कराड
9326711721