पेट्रोल व डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठीच
सातारा : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे 21 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. या आदेशाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल पंपाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी विहीत करुन ॲम्ब्युलन्सकरीता कायमस्वरुपी खुले राहतील असे निर्देश दिले होते. आता पेट्रोल व डिझेल विक्रीच्या वेळेमध्ये बदल न होता फक्त अत्यावश्यक वाहनांसाठीच पेट्रोल व डिझेल पंप खुले राहतील, असे सुधारीत आदेशाने कळविले आहे. तसेच ॲम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले राहतील असेही या आदेशामध्ये नमुद आहे.