कर्ज वसुली चालूच ठेवली तर चाबकाचे फटके देणार - साजिद मुल्ला


कर्ज वसुली चालूच ठेवली तर चाबकाचे फटके देणार - साजिद मुल्ला


कराड - शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या पाठीशी या अडचणीच्या काळात सरकार ने उभे राहावे.दरम्यान कर्ज वसुली चालूच ठेवली तर बळीराजा शेतकरी संघटना संबंधित बॅंका, पतसंस्था, संचालक, वसुली अधिकारी यांना चाबकाचे फटके देणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले.


आज कोरोना सारख्या रोगांवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, डाक्टर , आरोग्य कर्मचारी सर्वजण प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या काळात अतिशय चांगले काम केले आहे. उपाययोजना अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत. या काळात सरकारने अनैक दिलासादायक निर्णय घेतले. या काळात शेतीचं मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही.


केळी, द्राक्षे, भाजीपाला याला दर नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दुधाचे दर ही खाजगी दुध संघांनी दहा रूपयांनी कमी केले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे दुधाच्या पैशात दैनंदिन खर्च चालत होता. एकदम दहा रुपये दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे घर खर्चाचं नियोजन कोलमडणार होते. परंतू अशावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रोज दहा लाख लिटर दूध पंचवीस रुपये दराने महाराष्ट्र सरकार खरेदी करणार अशी घोषणा केली. हा निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारा आहे. बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने सरकारला आवाहन करण्यात येत आहे की, याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.


शेतकरी कोरोनाच्या लढाईत पुर्ण ताकतीने प्रशासनासोबत राहिला आहे. सरकारने सर्व बॅका, पतसंस्था यांना आदेश दिले आहेत कि, तीन महिने कोणतीही कर्ज वसुली करु नये. परंतू काही बॅंकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवून सक्तीची कर्ज वसुली चालू केली आहे. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तात्काळ सक्तीची कर्ज वसुली थांबवावी आणि शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या पाठीशी या अडचणीच्या काळात सरकार ने उभे राहावे.दरम्यान कर्ज वसुली चालूच ठेवली तर बळीराजा शेतकरी संघटना संबंधित बॅंका व पतसंस्था, संचालक, वसुली अधिकारी यांना चाबकाचे फटके देणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले. याची प्रशासनाने नोंद घ्यावी या अडचणीच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले